EnvironmentHobbyUnique

The Great Indian Book of Records – दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्

वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यासाठी सीड बँकेचा उपक्रम - प्रिया विठ्ठलराव मुपडे, बार्शी, जिल्हा - सोलापूर

वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यासाठी सीड बँकेचा उपक्रम

– प्रिया विठ्ठलराव मुपडे, बार्शी, जिल्हा – सोलापूर

प्रिया विठ्ठलराव मुपडे, बार्शी, जिल्हा – सोलापूर या वैद्यक शाखेची विद्यार्थिनी असून त्यांना सर्वप्रकारच्या फळांच्या बिया जमा करण्याचा छंद आहे. त्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना सीड बँकेचा उपक्रम समजावून सांगितला. पर्यावरणाच्या र्‍हासाचे वृक्षतोड हे मुख्य कारण असल्याने पुन्हा वनराई उभी राहण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. यासाठी शाळेत एक सीड बँक स्थापन करून विद्यार्थ्यांनी लिंबोळी व विविध फुले, फळे यांच्या बिया गोळा करून त्या सीड बँकेत जमा कराव्यात यासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी बिया गोळा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी फोनवरून सांगितली. अनेक मुलांनी संग्रहित केलेल्या बियांचे फोटोसुद्धा पाठवले आहेत. वेगवेगळ्या गावातून हा उपक्रम कार्यान्वित झाला आहे. संग्रहित केलेल्या बिया मातीत रुजवण्याचे आणि रोप तयार करण्याचे काम विद्यार्थी अतिशय आवडीने करत असून प्रिया मुपडे यासुद्धा विद्यार्थ्यांच्या सोबत सीड बॉल तयार करण्याचा आनंद घेत आहेत. गाव, परिसर आणि रिकामी जागा असेल त्याठिकाणी बिया टाकण्यात आल्या आहेत. मुलांना बिया टाकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. पालक, नातेवाईक आणि शेजारी-पाजारी यांनी स्वतः काही बियांचे बॉल तयार केले आणि पाऊस सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बियांचे बॉल टाकण्यात आले. भारतात रक्षाबंधनाला ऐतिहासिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय महत्त्व आहे. रक्षाबंधन हे भाऊ-बहि‍णीच्या भावनिक संबंधांचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातात रेशीम धागा बांधते. दीर्घायुष्य जीवन आणि सुरक्षिततेसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. रक्षाबंधन हा उत्सव नात्यातील बंधनास बळकट करतो आणि आपल्यात समाजवादाचा विकास करतो.

प्रिया मुपडे यांनी भारतीय वृक्षाच्या बियांच्या राख्या तयार केल्या. हातावर बांधलेल्या बियांच्या राख्या दुसर्‍या दिवशी काढून त्या राखीला लावलेल्या बिया कुंडीच्या मातीत रुजवून त्यांची रोपे तयार केली. त्यांचा हा आदर्श सर्वांनी घेतला तर निसर्ग रक्षणाचे प्रतीक असलेल्या राखी पोर्णिमेची एक सुंदर आठवण कायम आपल्या प्रिय जणांच्या मनात राहील. प्रिया विठ्ठलराव मुपडे यांचा वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यासाठी राबवलेला सीड बँकेचा उपक्रम  खरोखरच अनोखा ठरला असून त्यांच्या या उपक्रमाची नोंद ‘दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे.                                         (१६ फेब्रुवारी २०२१)

शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे