LargestLiteratureUnique

The Great Indian Book of Records – दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्

भारतातील सर्वात मोठा महाकाव्यग्रंथ: 'माझ्या मरणाआधीचा जाहीरनामा' - प्रा. अशोककुमार दवणे (नांदेड)

भारतातील सर्वात मोठा महाकाव्यग्रंथ:माझ्या मरणाआधीचा जाहीरनामा

– प्रा. अशोककुमार दवणे (नांदेड)

नांदेड येथील प्रा. अशोककुमार दवणे यांचा ‘माझ्या मरणाआधीचा जाहीरनामा’ हा भारतातील सर्वात मोठा महाकाव्यग्रंथ असून  भारतीय साहित्याच्या इतिहासात २०१२ कविता लिहिणारे प्रा. अशोककुमार दवणे हे एकमेव अग्रणी महाकवी म्हणून गौरवास पात्र ठरले आहेत ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कवी प्रा. अशोककुमार दवणे यांनी प्रतिभा आणि प्रतिमांच्या जोरावर विविधांगी हजारो विषयावरील  कवितांचा जन्मदाता विक्रमवीर म्हणून नावलौकिक मिळविला आहे. प्रा. अशोककुमार दवणे यांचे एम. ए. चे शिक्षण (प्रथम श्रेणी) उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैद्राबाद, आंध्रप्रदेश येथून  झालेले असून त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या वाङ्‌मय प्रकारातील ३७ पुस्तके लिहिली असून १० पुस्तकांचे संपादन केलेले आहे; ते स्वतः शेकडो पुस्तकांचे प्रकाशकसुद्धा आहेत.

          एक परिवर्तनवादी, सृजनशील कवी आणि लेखक म्हणून ते  संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी साहित्य प्रांतात मोलाची भर घालणारा आणि विद्यार्थी-संशोधकांना उपयोगी पडणारा प्रा. अशोककुमार दवणे द्वारा लिखित माझ्या मरणाआधीचा जाहीरनामा या महाकाव्यग्रंथाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे.                         (०४ एप्रिल २०२१)                                              

शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे